
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले याच्या वाढदिवसानीमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनी करून त्यांचे अभिष्टचिंतन केले. बहुजनांचे संघर्षनायक नेते रामदास आठवलेंचा वाढदिवस देशभर संघर्षदिन म्हणून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
रामदास आठवले यांचा वाढदिवस दरवर्षी २५ डिसेंबर ला रिपाइं तर्फे देशभर संघर्षदिन म्हणून साजरा होतो. या वर्षी देखील मुंबई, सोलापूर सह राज्यात सर्व जिल्ह्यात आणि देशभर सर्व राज्यात उत्साहात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून करण्यात आला. अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, कोरोना योद्ध्यांचा सत्कार, रुग्णांना फळवाटप, बिस्कीट वाटप, चादर वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रामदास आठवले यांचे जन्मदिना निमित्त अभिष्टचिंतन केले. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर आठवले स्टाईल शीघ्र कविता सादर करून ना रामदास आठवले यांचे अभिष्टचिंतन केले.