रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र, केली ही मोठी मागणी

रामदास आठवले म्हणाले की, राज्यातील मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर, सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करावीत.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील पाच महिन्यापांसून धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र देश अनलॉक होत आहे. परंतु धार्मिक स्थळांना खोलण्यात अजूनही परवानगी दिली नाही आहे. यासाठी राज्यातील मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासरल सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्राद्वार(Ramdas Athavale’s letter to the Chief Minister and the Governor) मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना केली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, राज्यातील मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर, सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करावीत. तसेच मास्क सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून राज्यात सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे सुरु करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र पाठविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील तीन जैन मंदिरामध्ये पर्युषण पर्वानिमित्त प्रार्थना करण्यास परवानगी दिली होती. तसेच सर्वा नियम पाळून पुजा करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने या मंदिरांना परवानगी दिली होती.