‘नो कोरोना नो’, रामदास आठवलेंचा नवा नारा

लंडन आणि युरोपमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रिंगबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा नारा दिलाय. यावेळचा त्यांचा नारा आहे ‘नो कोरोना नो’. कोरोनाचा नवा स्ट्रिंग भारतात येऊच नये, यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोरोना हा टिंगलटवाळीचा विषय नसून देशापुढील एक गंभीर प्रश्न असल्याची आठवणही त्यांनी नेटीझन्सना करून दिलीय.

भारतात कोरोना संसर्ग पसरण्याच्या अगोदर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलेला ‘गो कोरोना गो’ हा नारा देशभर चांगलाच गाजला होता. तो व्हायरल झाला आणि त्यावर अनेक मीम्सही तयार झाल्या. आता आठवलेंनी एक नवा नारा दिलाय.

लंडन आणि युरोपमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रिंगबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा नारा दिलाय. यावेळचा त्यांचा नारा आहे ‘नो कोरोना नो’. कोरोनाचा नवा स्ट्रिंग भारतात येऊच नये, यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोरोना हा टिंगलटवाळीचा विषय नसून देशापुढील एक गंभीर प्रश्न असल्याची आठवणही त्यांनी नेटीझन्सना करून दिलीय.

काही दिवसांपूर्वी स्वतः रामदास आठवले यांनाच कोरोना झाला होता. त्यावर वेळेत उपचार घेऊन ते बरेदेखील झाले होते. डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकावा आणि स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहनदेखील त्यांनी सर्वांना केलं होतं.

युकेमध्ये आढळलेलं कोरोनाचं नवं रूप अधिक घातक असल्याचं सांगितलं जातं. युरोपातून भारतात आलेल्यांपैकी १६ जण कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलंय. त्यांचे नमुने सध्या तपासले जातायत.