रामदास आठवलेंचा ड्रेस कोडला विरोध, रंगीबेरंगी कपड्यांना मनाई केल्यास मी मंत्रालयात कसा जाऊ?

राज्यसरकारने कर्मचाऱ्यांसाठी केलेली ड्रेस कोडची सक्ती मंत्र्यांसाठीदेखील जर लागू झाली, तर मात्र आपली चांगलीच पंचाईत होईल, असं ते म्हणालेत. रामदास आठवले हे रंगीबेरंगी कपडे परिधान करण्यासाठी ओळखले जातात. टी शर्टवर जाहीर सभा घेणारे एकमेव नेते अशी त्यांची ख्याती आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी विरोध केलाय. कुठले कपडे घालावेत, हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य असून अशा प्रकारची सक्ती करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतलीय.

राज्यसरकारने कर्मचाऱ्यांसाठी केलेली ड्रेस कोडची सक्ती मंत्र्यांसाठीदेखील जर लागू झाली, तर मात्र आपली चांगलीच पंचाईत होईल, असं ते म्हणालेत. रामदास आठवले हे रंगीबेरंगी कपडे परिधान करण्यासाठी ओळखले जातात. टी शर्टवर जाहीर सभा घेणारे एकमेव नेते अशी त्यांची ख्याती आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे.

ड्रेस कोडबाबत त्यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये ते म्हणतात, राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगीबिरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?

रामदास आठवलेंनी त्यास खास कपड्यांमध्ये अनोख्या शैलीत हा अनोखा सवाल उपस्थित केलाय. त्यांच्या या ट्विटवर विविध प्रकारच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे.