आमच्यासोबत शिवसेना सोडायला रामदास कदम पहिल्या नंबरला होते; निलेश राणेंचा खळबळजनक खुलासा

आम्ही शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. शिवसेना सोडणाऱ्या 15 नेत्यांची यादी होती. या यादीत रामदास कदम यांचे पहिले नाव होते. असा खळबळजनक खुलासा भाजपचे नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्याबाबत केला आहे.

    मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून ज्यांना मंत्रिपदे मिळाली ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. शिवसेनेतील काही मंत्री मला बाजूला करत आहेत’, असं पत्र शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलं होतं. दरम्यान याचं पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.

    निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

    ‘आम्ही शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. शिवसेना सोडणाऱ्या 15 नेत्यांची यादी होती. या यादीत रामदास कदम यांचे पहिले नाव होते’ आमच्या तेव्हाच्या शासकीय बंगल्यावरून रामदास कदम बाहेर पडले, खेडमध्ये परिस्थिती बघून येतो, कार्यकर्त्यांशी बोलून येतो मग बॉम्ब टाकूया असा शब्द दिला. ते महाडजवळ आले तेव्हा त्यांना बंगल्यावरून फोन आला विरोधी पक्ष नेते पद देतो, त्यावेळी त्यांनी गाडी वळवली आणि ‘मातोश्री’ला गेले आणि पद घेतलं, असं निलेश राणे म्हणाले.

    रामदास कदमांनी खोटे बोलणे सोडून द्यावे

    हेच रामदास कदम जे नेहमी पक्षाच्या विरोधात काम करत आलेत.अरे व्वा! ‘मेरे सपनो की रानी’ गाणं काय वाजवलं आहे. मुंबई पोलीस बँडचा जबरदस्त रामदास कदम यांच्याकडून पक्षनिष्ठा याबद्दल उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी अजिबात अपेक्षा ठेवू नये. ते तोंडावर सरळसरळ खोटे बोलत असतात, असंही निलेश राणे म्हणाले आहेत. तसेचं ‘महाराष्ट्र आता रामदास कदम विरोधी पक्षनेता होता हे विसरले आहे, बाहेर येऊन त्यांनी नारायण राणे यांच्यावर फक्त टीका केली, आता कदम हे ७० वयाचे झाले आहे. त्यांनी आता खरं बोललं पाहिजे, खोटे बोलणे सोडून द्यावे, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.