Rane's place in the first chair, Shiv Sena, NCP's sword will be sheath?

मराठा आरक्षणासाठी राणेंचा राजकीय वापर भाजपा करेल. उदयनराजे भाजपात असले, त्यांना राज्यसभा दिली असली तरी ते स्पष्ट भूमिका घेताना अडखळतायेत, तर संभाजीराजेंनी वेगळी चूल मांडण्याचा इरादा व्यक्त केला आहे. कसेही करुन राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आक्रमक चेहर्‍याच्या शोधात असलेल्या भाजपा नेतृत्वाने राणेंना मान दिला आहे.

    मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला सळो की फळ करणाऱ्या किंवा करु शकणाऱ्या राणेंना भाजपाने बळ दिले आहे. भाजपाचा आक्रमक चेहरा होण्याची राणे पिता पुत्रांना संधी आहे. राणेंना थेट मंत्रीमंडळात स्थान देत भाजपने महाराष्ट्रात शिवसेनवर कुरघोडी केली आहे.

    मराठा आरक्षणासाठी राणेंचा राजकीय वापर भाजपा करेल. उदयनराजे भाजपात असले, त्यांना राज्यसभा दिली असली तरी ते स्पष्ट भूमिका घेताना अडखळतायेत, तर संभाजीराजेंनी वेगळी चूल मांडण्याचा इरादा व्यक्त केला आहे. कसेही करुन राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आक्रमक चेहर्‍याच्या शोधात असलेल्या भाजपा नेतृत्वाने राणेंना मान दिला आहे.

    फडणवीस, शेलार, तावडे, पंकजा यांना डावलून राणेंना ही संधी देण्यात आली आहे. या शर्यतीत चंद्रकांत पाटीलही मागे पडले आहेत. ते प्रदेशाध्यक्ष आणि मराठा आहेत. शिवसेनेला त्यांच्याच भाषेत विशेषता राऊत, ठाकरेंची प्रतिमा मलिन करणारा नेता अशी कृती आगामी काळात राणे कुटुंबीयाला करावी लागणार आहे.

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मोदी मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत. शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे राणे हे कॉंग्रेस पक्षात देखील बराच काळ राहिले आहेत. 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात सोडला. एकेकाळी राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अगदी जवळचे मानले जात होते. राणे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी शिवसेनेत होते.