…पण 2024ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला

इतरांनी अशी स्वप्ने अनेक वर्षे पाहिली आहेत, असा चिमटा काढतानाच आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत त्यांना आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवू. इतकेच काय 2024च्या निवडणुकीत आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू, असा टोला दानवे यांनी राऊत यांना लगावला.

    मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता शिवसेना नेते संजय राऊत यांनी फेटाळून लावली आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मुद्द्यावर राऊतांना फटकारले आहे.

    रावसाहेब दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारचा प्रश्न कुणाला पडला आणि कुणाला अशी स्वप्न पडतात ते आम्हाला माहीत नाही. पण कोणत्याही प्रकारचे दिवा स्वप्न पाहायचे नाही, हे भाजपने ठरवले आहे. असे रावसाहेब दानवे म्हणाले.

    पुढे म्हणाले की, इतरांनी अशी स्वप्ने अनेक वर्षे पाहिली आहेत, असा चिमटा काढतानाच आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत त्यांना आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवू. इतकेच काय 2024च्या निवडणुकीत आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू, असा टोला दानवे यांनी राऊत यांना लगावला.