रावसाहेब दानवेंनी सांगितलं शरद पवारांच्या भेटीमागचं कारण…

साखर आणि कांदा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली असं त्यांनी रानसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत कोरोनावर चर्चा झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

भाजपा नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांची भेट घेतली. तसेच साखर आणि कांदा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली असं त्यांनी रानसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत कोरोनावर चर्चा झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाले असून कारखाने सुरु करण्यासाठी बँका पैसे उपलब्ध करुन देण्यास तयार नाहीत. ऊसाचे पीक यावर्षी मोठ्या प्रमाणात आले आहे. पुढच्या काळात शेतकरी अडचणीत येऊ नये. त्यांचा संपूर्ण ऊस गाळला जावा यासाठी बँकांशी काय चर्चा करता येईल? राज्य सरकारने काय केलं पाहिजे? केंद्र सरकारच्या नेत्यांना भेटून काही करता येईल का? या विषयावर माझी आणि पवारांची चर्चा झाली, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, याशिवाय कांदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष आम्ही पाहिला. त्यांना न्याय दिला पाहिजे. कांदा निर्यात बंद असल्याने भाव पडतील शेतकरी सांगत आहेत. त्यासाठी काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं पाहिजे अशी चर्चा झाली.