एक डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यास केंद्राची हरकत नाही – रावसाहेब दानवेंनी केले स्पष्ट

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक डोस घेतलेल्यांच्या रेल्वे प्रवासासाठी(Local Train Travel) रेल्वेची काहीच हरकत नाही. राज्य सरकारने परवानगी दिल्यास केंद्राची हरकत नसेल असे म्हटले आहे.

  मुंबई : मुंबईतील लाखो चाकरमान्यांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry)घेतल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक डोस घेतलेल्यांच्या रेल्वे प्रवासासाठी(Local Train Travel) रेल्वेची काहीच हरकत नाही. राज्य सरकारने परवानगी दिल्यास केंद्राची हरकत नसेल असे म्हटले आहे.

  दोन डोस पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा
  देशात कोरोनामुळे सर्वत्र निर्बंध लावण्यात आले. त्यानंतर देशात सर्वत्र लसीकरण मोहिम सुरू झाल्याने पुन्हा जनजीवन पूर्वपदावर येतानाच नागरीकांना नव्या जाचक अटींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत देखील लोकल प्रवास बंद असल्याने कर्मचारी वर्गाला प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्य सरकारने कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकलचा प्रवास सुरू केला. मात्र आता एक लस घेतलेल्यांना रेल्वेने प्रवास करता येत नव्हता. एक डोस घेतलेल्यांना मात्र त्यांचे दोन डोस पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.परंतु आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक डोस घेतलेल्यांच्या रेल्वे प्रवासासाठी रेल्वेची काहीच हरकत नाही. राज्य सरकारने परवानगी दिल्यास केंद्राची हरकत नसेल असे म्हटले आहे.

  केंद्राची आणि रेल्वेची हरकत नाही
  रावसाहेब दानवेंनी मुंबई सीएसएमटी ते दादर असा लोकल प्रवास केला. त्याआधी प्रवाशांसोबत दानवेंनी चर्चा केली. त्यावेळी प्रवाशांकडून एक डोस घेतलेल्यांना देखील रेल्वे प्रवास करता यावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर दानवेंने सांगितले की, केंद्राची आणि रेल्वेची यावर काहीही हरकत नाही, परंतु राज्य सरकार यावर अंतीम निर्णय घेईल. रेल्वेची परवानगी मिळाल्यावरती आता राज्य सरकारने सुद्धा त्यावर सहमती दर्शवावी अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे.

  मोठ्या गर्दीत बस किंवा इतर मार्गाने प्रवास
  नागरीक सध्या मोठ्या गर्दीत बस किंवा इतर मार्गाने प्रवास करत आहेत, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीही वाया जात आहे. लोकांना रोजगारासाठी घराबाहेर पडावेच लागते, परंतु रेल्वे बंद असल्याने त्यांचा प्रवासातच अर्धा वेळ जातो. त्यात लोकाना गर्दीत बसने प्रवास करावा लागत असून त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता वाढली आहे