घराबाहेर कोंबड्यांना दाने टाकत आसलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार; जालन्यातील धक्कादायक प्रकार

मुंबईत घडलेल्या भयंकर निर्भया बलात्कार प्रकरणानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. घराबाहेर कोंबड्यांना दाने टाकत आसलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार एका नराधमाने बलात्कार केला आहे. जालना येथील बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील शेतवस्तीवर हा प्रकार घडला.

    जालना : मुंबईत घडलेल्या भयंकर निर्भया बलात्कार प्रकरणानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. घराबाहेर कोंबड्यांना दाने टाकत आसलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार एका नराधमाने बलात्कार केला आहे. जालना येथील बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील शेतवस्तीवर हा प्रकार घडला.

    अन्वर खान कादर खान असे हे कृत्य करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. आरोपी फरार आहे. काल दुपारच्या वेळी अन्वर खान हा पिडितेच्या शेतवस्तीवरील घरी गेला होता तेथे कोणीच नसल्याचा फायदा घेत त्याने पिडित मुलीस केस धरून तीच्याच घरात नेऊन जबरी अत्याचार केला.

    पिडीत मुलीने घडलेला प्रसंग आपल्या आईस सांगितला. त्यावरून बदनापूर पोलिस स्टेशन मध्ये अन्वर खान कादर खान याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक आत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काल आरोपी फरार होता. आताच आलेल्या सुत्रांच्या महितीवरून पोलिसांनी आरोपी नराधमास जेरबंद केले आहे.