रश्मी शुक्लांनी केला होता अपक्ष आमदाराला भाजपात नेण्याचा प्रयत्न, आव्हाडांच्या आरोपामुळे भाजपाची गोची

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केलाय. एका अपक्ष आमदाराला भाजपच्या गळाला लावण्यासाठी रश्मी शुक्ला कार्यरत असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना गळाला लावण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांना वारंवार फोन केले, प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

    मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. परमबीर सिंग प्रकरणापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यांचं प्रकरण बाहेर काढत राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा मुद्दा समोर आणला.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केलाय. एका अपक्ष आमदाराला भाजपच्या गळाला लावण्यासाठी रश्मी शुक्ला कार्यरत असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना गळाला लावण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांना वारंवार फोन केले, प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

    पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याची चर्चा होती. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या आरोपांमुळे आता भाजपच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.