What I am is an honest confession of MP Praful Patel because of Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(rashtrawadi congress) आणि भारतीय जनता पार्टी(bhartiy janta party) एकत्र येणार या चर्चा चुकीच्या आहेत, असा खुलासा खुद्द राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल(rafull patel) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहे, असेही ते म्हणाले.

    मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(sharad pawar and amit shah meeting) यांची भेट झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार या चर्चा चुकीच्या आहेत, असा खुलासा खुद्द राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा पाया शरद पवार यांनीच रचला आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

    ही निव्वळ अफवा आणि भाजपचे षडयंत्र

    अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर २६ मार्चला ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती दैनिकाने दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

    अमित शाहांनी संभ्रम वाढवला

    प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत पवारांच्या भेटीबाबत एक वक्तव्य केले होते. सर्व भेटी सार्वजनिक केल्या जात नाहीत, असे शाह यांनी म्हटले. शाहांच्या या वक्तव्यानंतर नबाब मलिक यांनी शाह संभ्रम निर्माण करत असल्याचे म्हणाले. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून पवार आणि शाह यांची भेट झालीच नसल्याचे म्हटले आहे.