सरसंघचालकांनी  घेतली मुस्लिम विव्दानांची भेट; मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत(RSS chief Mohan Bhagwat) यानी मुंबईत पंचतारांकित हॉटेल (five-star hotel in Mumbai) मध्ये मुस्लिम समुदायाच्या(Muslim community) विद्वानांशी भेट घेवून चर्चा केली.  संघातील सूत्रांच्या माहितीनुसार  प्रख्यात कवी जावेद अख्तर यानी संघ परिवाराची तुलना तालिबान  सोबत केल्यानंतर वादंग सुरु असताना भागवत यांनी ही भेट घेतल्याने त्याला विशेष महत्व आहे.  

    मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत(RSS chief Mohan Bhagwat) यानी मुंबईत पंचतारांकित हॉटेल (five-star hotel in Mumbai) मध्ये मुस्लिम समुदायाच्या(Muslim community) विद्वानांशी भेट घेवून चर्चा केली.  संघातील सूत्रांच्या माहितीनुसार  प्रख्यात कवी जावेद अख्तर यानी संघ परिवाराची तुलना तालिबान  सोबत केल्यानंतर वादंग सुरु असताना भागवत यांनी ही भेट घेतल्याने त्याला विशेष महत्व आहे.

    तालिबानच्या सक्रीय होण्याच्या घटनेकडे संघ कोणत्या नजरेतून पाहतो आणि भारतीय मुस्लिम समुदायाच्या याबाबतच्यस नेमक्या भावना सरसंघचालकांनी  जाणून घेतल्याची माहिती या सूत्रानी दिली.

    भागवत  यांनी जुलै मध्ये गाजियाबाद मध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंच च्या एका संमेलनात  भाग घेतला होता.  त्यावेळी त्यानी म्हटले होते की हिंदू-मुस्लिम एकता ही अवधारणा चुकीच्या पध्दतीने केली गेली आहे., कारण मुळातच हे दोन्ही समुदाय  ४० हजार वर्षापासून एकत्र नांदत आले आहेत. सर्व भारतीयांचा DNA एकच आहे असे ते म्हणाले होते.

    संघ प्रमुखाच्या मुस्लिम विद्वानासोबतच्या  बैठकीची माहिती नुकत्याच संघाच्या  तीन दिवसीय समन्वय सम्मेलना दरम्यान स्पषट झाली. नागपुर मध्ये संघ मुख्यालयात 3 सप्टेंबरपासून सुरु असलेल्या या  सम्मेलनाचे समापन  रविवारी झाले.

    यावेळी संमेलनात मुख्य विषय उत्तर प्रदेश, उत्तराखंड सह पांच राज्यात होणा-या आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर  करणे ही होती. संघ प्रमुखांच्या मुस्लिम विद्वाना सोबतच्या बैठकीलाही याच रणनीतीचा भाग म्हणून पाहीले जात आहे असे या सूत्रांनी सांगितले.