BMC

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात (Praja Foundation Report) पालिका विरोधी पक्षनेते रवि राजा(Ravi Raja) यांना सर्वोत्कृष्ट नगरसेवक(Best Corporator) म्हणून प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. तर शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर दुसरा तर तिसरा क्रमांक भाजप नगरसेवक हरिश छेडा यांना मिळाला आहे.

    मुंबई: मुंबई महापालिकेतील(BMC) नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशनच्या अहवालाच्या(Praja Foundation Report) माध्यमातून प्रसिद्ध झाला. पालिका विरोधी पक्षनेते रवि राजा(Ravi Raja) यांना सर्वोत्कृष्ट नगरसेवक(Best Corporator) म्हणून प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. तर शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर दुसरा तर तिसरा क्रमांक भाजप नगरसेवक हरिश छेडा यांना मिळाला आहे.

    प्रजा फाऊंडेशनने मुंबई पालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेत गुरुवारी संयुक्त प्रगती पुस्तक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपच्या हरीश छेडा यांची निवड झाली आहे. या तीन्ही नगरसेवकांना प्रजा फाऊंडेशनच्या मानकानुसार अनुक्रमे ८१.१२ टक्के, ८०.४२ टक्के आणि ७७.८१ टक्के गुण प्राप्त झाले आहे.

    कोरोना प्रादूर्भावामुळे प्रजा फाऊंडेशनने यंदा नगरसेवकांचे वार्षिक प्रगती पुस्तक तयार केलेले नाही. प्रजा फाऊंडेशनने नगरसेवकांच्या २०१७ ते २१ पर्यंतच्या चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. या संयुक्त प्रगती पुस्तकात प्रजा फाऊंडेशनने निर्धारित घटकांची गोळाबेरीज केल्यानंतर मुंबई पालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी केवळ १० टक्के म्हणजेच २२ नगरसेवकांचा ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरित नगरसेवकांना क, ड, ई, फ श्रेणीत समावेश झाला आहे.