महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन प्रतीकात्मक फोटो
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन प्रतीकात्मक फोटो

मुंबई (Mumbai): महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने (राज्य) क्रीडामंत्री सुनील केदार यांना एक पत्र लिहून राज्यातील क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची विनंती महाराष्ट्र बॅडमिंटन संघातर्फे करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक क्रीडा प्रशिक्षकांच्या आजीविकेवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.

  • खेळांचे सामने सुरू करण्यासाठी क्रीडामंत्री सुनील केदार यांना पत्र

मुंबई (Mumbai): महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने (राज्य) क्रीडामंत्री सुनील केदार यांना एक पत्र लिहून राज्यातील क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची विनंती महाराष्ट्र बॅडमिंटन संघातर्फे करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक क्रीडा प्रशिक्षकांच्या आजीविकेवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. केंद्रीय अध्यक्ष अरुण लखानी यांनी मंत्री केदार यांना लिहिलेल्या पत्रातून म्हटले की, थेट संपर्क यंत्रणा नसल्यामुळे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) नंतर बॅडमिंटन अकादमी उघडल्या गेलेल्या इतर राज्यांचे उदाहरण समोर आहेच.

लॉकडाऊनमुळे क्रीडा प्रशिक्षकांच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे हे सांगण्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे २०० प्रशिक्षकांनी राज्य बॅडमिंटन असोसिएशनला पत्र लिहिले आहे. “जगण्याचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे संपूर्ण राज्यात प्रशिक्षकांच्या जीवनावर त्याचे वाईट परिणाम झाले आहेत.” त्याचप्रमाणे राज्यातील अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडूंकडे सरावासाठी दुसÚया राज्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. ज्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे खेळाडूंसाठी राज्यातील बॅडमिंटन उपक्रम तातडीने पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र बॅडमिंटन संघातर्फे करण्यात आली आहे.