राज्यातील वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या फेर नियुक्ती आणि बदल्या ; एस व्ही आर श्रीनिवास, मुंबई महानगर विकास प्राधिकरणावर

राजीव यांना दुस-यांदा मुदतवाड देण्यास राज्य सरकारने काल नकार दिल्यानंतर हे नवे फेरबदल करण्त आले आहेत. श्रीनीवास यांच्या रिक्त होत असलेल्या पदावर मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव,(गृहनिर्माण) यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

    मुंबई: राज्यातील वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या फेर नियुक्ती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात एस व्ही आर श्रीनिवास, प्रधान सचिव, गृहनिर्माण यांची नियुक्ती महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई या आर ए राजीव यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर करण्यात आली आहे.

    राजीव यांना दुस-यांदा मुदतवाड देण्यास राज्य सरकारने काल नकार दिल्यानंतर हे नवे फेरबदल करण्त आले आहेत. श्रीनीवास यांच्या रिक्त होत असलेल्या पदावर मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव,(गृहनिर्माण) यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

    या शिवाय ज्येष्ठ सनदी अधिकारी लोकेश चंद्रा, प्रधान सचिव यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर करण्यात आली आहे.तर लोकेश चंद्र यांच्या रिक्त होना-या जागेवर विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.), सामान्य प्रशासन विभाग पदावर करण्यात आली आहे.

    सिकॉम्चे व्यवस्थापकीय संचालक बी वेणुगोपाल रेड्डी, यांची नियुक्ती प्रधान सचिव वने या पदावर करण्यात येत असून सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांची नियुक्ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2) या पदावर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने या सर्वांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमीत केले आहेत.