Re-extension of polytechnic application registration; The first list will be announced on September 13

पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबवणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ३० जुलैपासून सुरुवात करण्यात आली. अर्ज नोंदणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली तरी ८० हजारपेक्षा अधिकच विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला ७ सप्टेबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    मुंबई: पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेला तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर आता पुन्हा ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ देतानाच प्रवेशासाठीचे वेळापत्रकही तंत्रशिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

    पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबवणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ३० जुलैपासून सुरुवात करण्यात आली. अर्ज नोंदणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली तरी ८० हजारपेक्षा अधिकच विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला ७ सप्टेबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    अर्ज भरल्याची मुदत संपल्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी ९ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. यादीमध्ये काही हरकती असल्यास त्या १० ते १२ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना सादर करता येणार आहेत. त्यानंतर १३ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्याबरोबरच प्रवर्गनिहाय जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान विकल्प भरता येणार आहे. १९ ते २२ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना लॉगइनद्वारे जागा निश्चित करायची असून, २३ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचे आहेत.