या कारणांमुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण, जाणून घ्या खरी कारणं…

२०२१ हे साल कोरोना नष्ट होण्याचं असेल, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ वर्तवत होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे नवनवे स्ट्रेन्स येताना दिसत आहेत. ब्रिटन, दक्षिण अफ्रिका, फिनलँड यानंतर आता भारतातही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. 

  देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही कोरोनाची दुसरी लाट आहे, असं ठोसपणे म्हणता येत नसलं तरी तशी शक्यता नाकारता येत नाही.

  २०२१ हे साल कोरोना नष्ट होण्याचं असेल, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ वर्तवत होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे नवनवे स्ट्रेन्स येताना दिसत आहेत. ब्रिटन, दक्षिण अफ्रिका, फिनलँड यानंतर आता भारतातही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता ती ९ लाख ९१ हजार ५१ एवढी झालीय. यापैकी तब्बल १ लाख ५६ हजार ३०२ जणांचा यात मृत्यू झालाय. १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झालीय. त्याची काही ठोस कारणं सांगितली जात आहेत.

  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यंत्रणा – एखादा कोरोना रुग्ण कितीजणांच्या संपर्कात आला आणि नेमका कुणाकुणाच्या संपर्कात आला, याचा शोध घेऊन त्या व्यक्तींपर्यंत पोहोचणारी यंत्रणा म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यंत्रणा. ही यंत्रणा ग्रामीण भागात तितकीशी सक्षम नाही. अनेक छोट्या शहरांमध्ये ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात मर्यादा येत असल्याचं चित्र आहे.
  • भीती कमी झाली – काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसविषयी लोकांना माहिती नव्हती. युरोप आणि अमेरिकेत अनेक लोक यामुळे मरत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे प्रत्येकजण छोट्या मोठ्या गोष्टीचीही काळजी घेत होता. मात्र आता लस उपलब्ध असल्याने अनेकांनी याबाबतीत टाळाटाळ करायला सुरुवात केल्याचे दिसते.
  • रुग्णालयांची परिस्थिती सुधारली – काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याची स्थिती होती. त्यामुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची सर्वसामान्य पूर्ण काळजी घेत असत. मात्र आता आपल्याला कोरोना झाला तरी उपचार मिळू शकतात आणि आपण बरे होऊ, असा आत्मविश्वास वाढल्याने अनेकांनी काळजी घेणे कमी केले आहे.
  • मास्क लावण्यात हयगय – जिथं पोलीस दिसतील, तिथेच मास्क लावायचा आणि इतर वेळी तो मानेवर किंवा गळ्यावर टांगून फिरायचं, असे प्रकार वाढत चालल्याने कोरोना फैलावाचा वेग वाढला आहे.
  • कोरोनाबाबतचे गैरसमज – प्रत्यक्षात कोरोना व्हायरस अस्तित्वातच नाही, तो अत्यंत सामान्य विषाणू आहे वगैरे अनेक अफवा लोकांमध्ये पसरत असल्याने कोरोनाचे गांभिर्य कमी होत असल्याचेही चित्र दिसत आहे.