प्रताप सरनाईक यांच्याकडून २१ कोटींचा दंड वसूल करा – किरीट सौमय्या

विहंग गार्डन इमारतमधील लोकांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी किरीट सौमय्यांनी आयुक्तांना केली आहे.

    मुंबई : माजी खासदार आणि भाजपा नेते यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्याकडून २१ कोटी रुपये दंड वसूल करावे, अशी मागणी केली. सौमय्या हे बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हि माहिती दिली.

    विहंग गार्डन इमारतमधील लोकांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी मी आयुक्तांना केली आहे. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी मी आज आलो होतो, असं सोमय्या म्हणाले.
    सरनाईक यांच्याकडून अद्यापही हा दंड वसूल झाला नाही. ठाकरे सरकार सरनाईक यांच्याकडून २१ कोटी दंड का वसूल करत नाही? सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार? असा सवाल त्यांनी केला. या कारवाईबाबत राज्य सरकारशी चर्चा करून लवकरच पावलं उचलणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

    दरम्यान मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला गेला. आता अनिल परब यांचे ऑफिस तुटणार आणि प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार यासाठी मी ठाणे महापालिका आयुक्त यांना भेटायला आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना निवडले आहे, असं ते म्हणाले.

    सौमय्या यांची बोलती बंद करा, असं ठाकरे सरकारचं म्हणणं आहे. माझ्यावर हल्ला झाला होता. तेव्हा माझ्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षक होते म्हणून माझा जीव वाचला. मी सुरक्षा मागितली नव्हती. केंद्राकडे आयबीचा तसा रिपोर्ट गेला म्हणून मला सुरक्षा मिळाली. हे सरकार घोटाळेबाज आहे. ठाकरे सरकार आणि शिवसेनेने कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला देखील आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, अंस सौमय्या यांनी म्हटले.