CST स्थानकात वाझेच्या लोकल प्रवासाचे रिक्रिएशन; एनआयएचा तपास सुरूच

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) करत आहे. तपासादरम्यान एनआयएच्या हाती अनेक सीसीटीव्ही फूटेज लागले आहेत. यातील एक फुटेज सीएसएमटी(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) स्थानकातील आहे. ज्या दिवशी हिरेनची हत्या झाली त्या दिवशी सचिन वाझेने सीएसएमटी ते ठाणे असा लोकलने प्रवास केला होता.

  मुंबई : अँटिलिया प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिसांनी निलंबित केलेला एपीआय सचिन वाझेला घेऊन सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथक मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात दाखल झाले. येथे एनआयएच्या पथकाने सीन रीक्रिएट केला. तसेच सीसीटीव्ही फुटेजसोबत पुरावे अधिक मजबूत करण्यासाठी वाझेला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर घेऊन गेले. येथे सीसीटीव्ही पुरावा क्रॉस-व्हेरिफाईड करता यावा यासाठी रेड-टॅपिंग करून सचिन वाझेला चालायला लावून सीन रिक्रिएट करण्यात आला. या वेळी फॉरेन्सिक टीमही हजर होती. संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर पथक सचिन वाझेला गाडीत बसवून परतले.

  त्या रात्री केला होता लोकल प्रवास

  मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) करत आहे. तपासादरम्यान एनआयएच्या हाती अनेक सीसीटीव्ही फूटेज लागले आहेत. यातील एक फुटेज सीएसएमटी(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) स्थानकातील आहे. ज्या दिवशी हिरेनची हत्या झाली त्या दिवशी सचिन वाझेने सीएसएमटी ते ठाणे असा लोकलने प्रवास केला होता.

  कार्यालयातच ठेवला होता मोबाईल

  लोकलच्या गर्दीत ओळख पटणे कठीण आहे. त्यामुळे वाझे ठाण्याला लोकलने गेल्याचे तपासात समोर आले आहे. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आपला वाझेने मोबाईल कार्यालयातत ठेवला होता. फोन उचलण्यासाठी एका मित्राला ठेवले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.

  सचिन वाझे याची कोठडी 7 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेष कोर्टाने एनआयएला सचिन वाझेला सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष कोर्टाने तपास एजन्सीला 7 एप्रिल रोजी त्याच्या पुढील हजेरीदरम्यान त्याच्या तब्येत व आजारपणाबद्दल तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले.