मुंबई महापालिकेत १८५ पॅरामेडिकल पदांसाठी भरती

पालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी बीएससी तसेच फार्मासिस्ट पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची बीफार्मा पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

    मुंबई – मुंबई महापालिकेत विविध रिक्त पदांवर १८५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आणि औषध विक्रेत्यांच्या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून याची मुदत २८ मे पर्यंत असणार आहे.

    पालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी बीएससी तसेच फार्मासिस्ट पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची बीफार्मा पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

    पालिकेच्या अधिकृत @ portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल अर्जासाठी २८ मे अंतीम मुदत असणार आहे. प्रयोग शाळा तंत्रज्ञसाठी ८९ तर फार्मासिस्टसाठी ९६ जागांसाठी अर्ज करता येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.