Refusal to reduce fees from schools during the Corona period Financial, educational and administrative inspection of schools will be done in last 7 years
कोरोना काळात शाळांकडून फी कमी करण्यास नकार

  • नफेखोरी करणाऱ्या शाळांची आर्थिक तपासणी करण्यासाठी पथक स्थापन

मुंबई : शिक्षण राज्यमंत्री (Minister of State for Education) बच्चूभाऊ कडू (Bachchubhau Kadu) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विभागातील (mumbai division) पालकांची बैठक (parents meeting) घेण्यात आली, या बैठकीत पालकांनी शाळाकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाच्या तक्रारी (Complaints of financial exploitation) दाखल केल्या, या तक्रारीची दाखल घेऊन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी नफेखोरी (Profiteering) करणाऱ्या शाळांवर फौजदारी गुन्हा (Criminal offense) दाखल करण्याचे आदेश दिले होते, त्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी चौकशी पथकांची स्थापना केली आहे, हे पथक शाळेत जाऊन सर्व कागदपत्रे तपासून त्याचा अहवाल राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सादर करतील, पहिल्या तपासणीत पुढील शाळांची नावे आहेत

१) सेंट जोसेफ शाळा, पनवेल,

२) युरो स्कूल, ठाणे,

३) युनिव्हर्सल स्कूल घाटकोपर,

४) ब्राईट स्टार इंटरनॅशनल स्कूल, ग्रँटरोड

मनमानी पद्धतीने फी वाढ करणाऱ्या शाळांना लगाम घालण्यासाठी अशाप्रकारची महाराष्ट्रात प्रथमच कारवाई होत असून पालकांनी शाळाविरोधी तक्रार असल्यास ती लेखी स्वरूपात पुराव्यासह praharvs@gmail. com वर पाठवावी असे आवाहन प्रहार विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष ॲड. मनोज टेकाडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ॲड. अजय तापकीर, प्रवक्ता महाराष्ट्र व संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष ९०२९२३७०५६, ९७७३२७३०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.