१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात, अशी करा नोंदणी, ऑनलाईन रजिस्ट्रेशनशिवाय नो एंट्री

१मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला आजपासून सुरुवात झालीय. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं लसीकरणासाठी नोंदणी केली जात होती. मात्र थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आधार कार्ड दाखवून लसीकरण करता येत होतं. आता मात्र ही सुविधा नसणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलंय. 

  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलाय. दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता असून हा आकडा आता दैनंदिन ३ लाखांच्या वर पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू होतंय. मात्र ही लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलंय.

  १मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला आजपासून सुरुवात झालीय. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं लसीकरणासाठी नोंदणी केली जात होती. मात्र थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आधार कार्ड दाखवून लसीकरण करता येत होतं. आता मात्र ही सुविधा नसणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलंय.

  खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण करायचं असेल, तर पैसे मोजून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध असेल. सरकारी आणि खासगी असे दोन्ही पर्याय रुग्णांना उपलब्ध असतील. मात्र सरकारी केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही एकमेव पद्धत असणार असून थेट केंद्रावर जाऊन  लस मिळवण्याचा पर्याय आता उपलब्ध असणार नाही.

  असं करा रजिस्ट्रेशन

  • आरोग्य सेतू ऍपमधील कोविन टॅबवर क्लिक करा
  • लसीकरण नोंदणीचा पर्याय निवडा आणि आपला मोबाईल नंबर एंटर करा
  • आपल्याला एक ओटीपी मिळेल, तो एंटर करा
  • पुढच्या पेजवर तुमचं ओळखपत्र, क्रमांक, नाव, लिंग वगैरे तपशील भरा आणि रजिस्टरवर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट शेड्युल करण्याचा पर्याय मिळेल.
  • त्यानंतर तुमच्या जागेचा पीन कोड टाका. तिथे तुम्हाला उपलब्ध लसीकरण केंद्रांचा तपशील दिसेल
  • तारीख, वेळ आणि वार निवडा आणि त्यावर क्लिक करा