Great relief to the students MHT-CET will be on the reduced curriculum nrvb

बारावीच्या परीक्षेसंदर्भातील गोंधळ शिक्षण विभागाने दूर केल्यानंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठीच्या नोंदणीला 8 जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली. इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. गतवर्षी एमएचटी सीईटीच्या परीक्षेला राज्यातून ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंदणी तर राज्याबाहेरील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती.

    मुंबई : बारावीच्या परीक्षेसंदर्भातील गोंधळ शिक्षण विभागाने दूर केल्यानंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठीच्या नोंदणीला 8 जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली. इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. गतवर्षी एमएचटी सीईटीच्या परीक्षेला राज्यातून ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंदणी तर राज्याबाहेरील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. मात्र, बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर सीईटी सेलनेही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी 8 जूनच्या मध्यरात्रीपासून नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.

    ही नोंदणी प्रक्रियेला एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेसंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोेंदणीनंतर  आठ ते 10 दिवसांनी अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए.बीएड, एमए.एमएड, फाईन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली. नोंदणीच्या माहितीसाठी सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.

    एमएचटी सीईटी परीक्षेसाठी गतवर्षी राज्यातून ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक ४०,६६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल मुंबई २५,४१७, अहमदनगर २५,२८७, नाशिक २२,६०७, नागपूर २२,५५६, ठाणे २३,१२० या जिल्ह्यातून नोंदणी झाली होती. त्याचप्रमाणे परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मध्य प्रदेशमधून सर्वाधिक २८७४, उत्तर प्रदेश २४७०, बिहार २१७६, गुजरात १६७९, कर्नाटक १३२९ या राज्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.

    हे सुद्धा वाचा