राज्यात १० हजार ८९१ इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५ टक्क्यांनी वाढले

मुंबईत दिवसभरात ६८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१२०५५ एवढी झाली आहे. तर ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५००६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मुंबई : मंगळवारी राज्यात १०,८९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,५२,८९१ झाली आहे. काल १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,६७,९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात काल २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २०८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

    यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०७ ने वाढली आहे. हे ४०७ मृत्यू, ठाणे-६३, पुणे-५४, नाशिक-५२, अकोला-३०, सांगली-२९, सातारा-२२, यवतमाळ-२२, अहमदनगर-१९, नागपूर-१६, रायगड-१५, औरंगाबाद-१२, चंद्रपूर-११, कोल्हापूर-९, रत्नागिरी -८, नांदेड -६, उस्मानाबाद-६, सिंधुदुर्ग-६, सोलापूर-६, भंडारा-४, लातूर-४, जालना-३, अमरावती-२, बीड-२, जळगाव-२, परभणी-२, गडचिरोली-१ आणि गोंदिया-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ६८२:

    मुंबईत दिवसभरात ६८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१२०५५ एवढी झाली आहे. तर ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५००६ मृत्यूची नोंद करण्यात आली.