Great relief to the students MHT-CET will be on the reduced curriculum nrvb

इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणार्‍या एमएचटी सीईटीला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १२०० विद्यार्थ्यांनी पैसे भरुन आपला अर्ज निश्चित केला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठीच्या नोंदणीला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली.

    मुंबई : इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणार्‍या एमएचटी सीईटीला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १२०० विद्यार्थ्यांनी पैसे भरुन आपला अर्ज निश्चित केला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठीच्या नोंदणीला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही पुढे ढकलली होती. बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर सीईटी सेलनेही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

    त्यानुसार इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रियेला एक महिन्यांची मुदत असणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आले आहेत. त्या पाठोपाठ मुंबई आणि ठाण्यातून अर्ज आल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.

    या बरोबरच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए.बीएड, एमए.एमएड, फाईन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली. नोंदणीच्या माहितीसाठी सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.

    हे सुद्धा वाचा