जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे नियमित व पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण, मुंबईतील १८ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सन २०२० मध्ये नियमित व पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात आले असून

 मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सन २०२० मध्ये नियमित व पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणात १८ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत.  या अतिधोकादायक १८ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ७ इमारतींचाही समावेश आहे.

 १) इमारत क्रमांक १४४, एमजीरोड,अ- ११६३ (मागील वर्षीच्या यादीतील)   

 २) इमारत क्रमांक ५०-५८, एम सारंग स्ट्रीट/ओल्ड नागपाडा क्रॉस लेन,

 ३) इमारत क्रमांक १०१-१११, बारा इमारत रोड,  (मागील वर्षीच्या यादीतील)

 ४) इमारत क्रमांक ७४ निजाम स्ट्रीट,  (मागील वर्षीच्या यादीतील)

 ५) इमारत क्रमांक १२३, किका स्ट्रीट  (मागील वर्षीच्या यादीतील)

 ६) इमारत क्रमांक २४२-२४४, बारा इमाम रोड,

 ७) इमारत क्रमांक १६६ डी, मुंबादेवी रोड,

 ८) इमारत क्रमांक २३७, संत सेना महाराज मार्ग

 ९) इमारत क्रमांक २३९, संत सेना महाराज मार्ग

 १०) इमारत क्रमांक १४ भंडारी स्ट्रीट

 ११) इमारत क्रमांक १२ (२) नानुभाई बेहरमजी रोड

 १२) इमारत क्रमांक ३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी. रोड  (मागील वर्षीच्या यादीतील)

 १३) इमारत क्रमांक ३९१ डी, बदाम वाडी व्ही.पी. रोड  (मागील वर्षीच्या यादीतील)

 १४) इमारत क्रमांक ४४३ वांदेकर मेंशन, डी ४३१, डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग, गिरगाव  (मागील वर्षीच्या यादीतील) 

 १५) इमारत क्रमांक २७३-२८१, फॉकलॅंड रोड (डी- २२९९-२३०१),

 १६) इमारत क्रमांक १, खेतवाडी, १२ वी गल्ली (डी २०४९) ,

 १७) इमारत क्रमांक १०० डी, न्यू स्टार मेंशन, शाहीर अमर शेख, जेकब सर्कल, ग दक्षिण- ४८(२२),

 १८) इमारत क्रमांक ४४, मोरलॅंड रोड, सिराज मंझिल. 

या अतिधोकादायक इमारतींमध्ये ३१७ निवासी व २२३ अनिवासी असे एकूण ५४० रहिवासी / भाडेकरू आहेत. १२१ निवासी भाडेकरू / रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत २० रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित भाडेकरू / रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ३५४ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे. सदर अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी/ भाडेकरू यांना आवश्यकतेनुसार मंडळातर्फे जागा खाली करण्याच्या सूचना देण्याची व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू / रहिवाशाना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे कि  त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे.