forbes india rich list 2020 reliance mukesh ambani tops for 13th consecutive time
फोर्ब्सची (forbes india) सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर; मुकेश अंबानी सलग १३ व्या वर्षी अव्वलस्थानी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेझॉनचे प्रमुख जेफ बजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट आणि फेसबुकचे संस्थापक प्रमुख मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. तर, अंबानी या यादीत अकराव्या स्थानावर आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीतील त्यांचे पहिले स्थान कायम आहे. भारतात मुकेश अंबानी यांच्यानंतर विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी यांचा नंबर लागतो.

मुंबई : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Muesh Ambani) जगातील आघाडीच्या टॉप टेन श्रीमंताच्या यादीतील स्थान गमावले आहे. या जागतिक यादीत अंबानी अकराव्या स्थानावर असले तरी भारतातील श्रीमंतांच्या यादीतील त्यांचे पहिले स्थान अजून कुणीही घेऊ शकलेले नाही.

ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती (NetWorth) ७६.५ बिलियन डॉलर म्हणजेच ५.६३लाख कोटी इतकी आहे. सर्जी ब्रिन आणि स्टीव बॉल्मर यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी आघाडीच्या दहा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेझॉनचे प्रमुख जेफ बजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट आणि फेसबुकचे संस्थापक प्रमुख मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. तर, अंबानी या यादीत अकराव्या स्थानावर आहेत.

रिलायन्सस इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. याचा परिणाम अंबानींच्या उत्पन्नावर झाला. शेअर ढासळल्याने उत्पन्न कमी झाले. यामुळेच अंबानींनी आहे. टॉप टेन श्रीमंताच्या यादीतील स्थान गमावले आहे.

भारतातील श्रीमंतांच्या यादीतील त्यांचे पहिले स्थान कायम आहे. भारतात मुकेश अंबानी यांच्यानंतर विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी यांचा नंबर लागतो.