Reliance Industries: 15 members, including Mukesh Ambani, Nita Ambani, Anil Ambani and Tina Ambani, will have to pay a fine of Rs 25 crore.

जानेवारी 2000 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 12 कोटी शेअर्सचे अंबानी कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटप करण्यात आले. यावेळी सेबीच्या कलम 11 (1) चे उल्लंघन केल्याचे निदर्शनात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे 12 कोटी शेअर प्रत्येकी 75 रुपयांप्रमाणे 38 जणांना वाटप करण्यात आले. 1994 साली जारी करण्यात आलेल्या सहा कोटी अपरिवर्तनीय रोख्यांच्या बदल्यात जानेवारी 2000 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वाटण्यात आले.

    मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या समभाग वाटपात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबातील 15 सदस्यांवर सेबीने कारवाई केली आहे. मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्यासह आणखी 15 सदस्यांना सेबीने 25 कोटींचा दंड ठोठावला. यात रिलायन्स समूहातील काही कंपन्यांवर देखील दंडाची कारवाई करण्यात आली आहे. अंबानी कुटुंबियांना पुढील ४५ दिवसांत दंडाचे शुल्क भरावे लागणार आहे.

    जानेवारी 2000 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 12 कोटी शेअर्सचे अंबानी कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटप करण्यात आले. यावेळी सेबीच्या कलम 11 (1) चे उल्लंघन केल्याचे निदर्शनात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे 12 कोटी शेअर प्रत्येकी 75 रुपयांप्रमाणे 38 जणांना वाटप करण्यात आले. 1994 साली जारी करण्यात आलेल्या सहा कोटी अपरिवर्तनीय रोख्यांच्या बदल्यात जानेवारी 2000 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वाटण्यात आले.

    शेअर अधिग्रहण किंवा ताब्यात घेण्यासंदर्भात सेबीच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे सेबीच्या निदर्शनात आले. रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला त्यावेळी सादर केलेल्या माहितीमध्ये ज्या 38 जणांना शेअर वाटप करण्यात आले ते रिलायन्सचे प्रवर्तक होते. मात्र सेबीच्या नियमानुसार प्रवर्तकांना शेअर वाटपाची 5 टक्के मर्यादा असताना प्रत्यक्षात रिलायन्स प्रवर्तकांनी 6.83 शेअरचे अधिग्रहण केले. याबाबत कंपनीने ही माहिती सार्वजनिक केली नाही, असा ठपका सेबीने अंबानी कुटुंबियांवर ठेवला.