रिलायन्स विकणार मेट्रो प्रकल्पातील भागीदारी, सरकारला लिहिले पत्र

कंपनी कोरोना आधीपासून तोट्यात होती. तसेच कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने असा निर्णय घेतल्याचे समजते आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मेट्रोमध्ये ६९ टक्के भागीदारी आहे तर २६ टक्के शेअर्स मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ५ टक्के ट्रान्सडेव्ह या कंपनीचे आहेत.

मुंबई : देशात मागील ५ महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे देशासह राज्यातील सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत. तसेच मुंबईतील मेट्रो वन चे देखील व्यवहार मागील पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चरची मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मेट्रो प्रकल्पात असलेली भागीदारी विकणार असल्याचे समजत आहे. याबाबत कंपनी विचार करत असून तसे सरकारला पत्र लिहिले आहे.

कंपनी कोरोना आधीपासून तोट्यात होती. तसेच कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने असा निर्णय घेतल्याचे समजते आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मेट्रोमध्ये ६९ टक्के भागीदारी आहे तर २६ टक्के शेअर्स मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ५ टक्के ट्रान्सडेव्ह या कंपनीचे आहेत.

याबाबत नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कडून भागीदारी विकण्याबाबत पत्र मिळाले आहे. परंतु यावर अद्याप कोणता निर्णय झाला नाही आहे. यावर राज्य सरकार मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे मत जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.