मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उद्यापासून नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

मुंबई (Mumbai): राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी व पुरामुळे उभी पीके वाया गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याने मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे  १८  ऑक्टोबर पासून या भागाचा  पाहणी दौरा करून नुकसानीचा आढावा घेणार आहेत. 

१८ ऑक्टोबर रोजी सकाळी मदत व पुनर्वसन मंत्री नांदेड येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर शासकीय अधिका-यांसोबत लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ व निलंगा तालुक्याचा दौरा करून नुकसानाची पाहणी करणार आहेत. तसेच दुपारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत.  त्यानंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, उमरगा, तुळजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अधिका-यांसोबत बैठक घेणार आहेत.

१९ ऑक्टोबर रोजी ते सोललापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व बार्शी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून अधिका-यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागांना भेटी देऊन अधिका-यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात विजय वडेट्टीवार अधिका-यांसोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले.