पश्चिम मार्गावरील प्रवाशांची सुटका; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज Mega Block, वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा मार्ग निश्चित करा

सीएसएमटी मुंबईहून (CSMT Mumbai) सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.४४ पर्यंत सुटणारी डाऊन जलद सेवा (Down Fast Services) त्यांच्या वेळापत्रकानुसार माटुंगा आणि मुलुंड (Matunga And Mulund) दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर (Down Slow Line) वळवली जाईल.

  मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी (Maintainance) मुंबई विभागात (Mumbai Division) मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) दोन्ही मार्गांवर (Main And Harbour Line) आज मेगाब्लॉक (Today Mega Block) घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील (Harbour Line) प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत मेन लाइन (Main Line) आणि ट्रान्सहार्बर मार्गा (Trans Harbour Line) वरून प्रवास करण्याची परवानगी (Travel Permission) देण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वे लाइनवर आज कोणताही जम्बो ब्लॉक घेण्यात येणार नाही (Today no Jumbo Block on Western Railway Line).

  मेन लाइन

  माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग (सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ वाजेपर्यंत )

  सीएसएमटी मुंबईहून (CSMT Mumbai) सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.४४ पर्यंत सुटणारी डाऊन जलद सेवा (Down Fast Services) त्यांच्या वेळापत्रकानुसार माटुंगा आणि मुलुंड (Matunga And Mulund) दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर (Down Slow Line) वळवली जाईल. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी येतील.

  सकाळी १०.४६ ते दुपारी ०३.२६ पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा (Thane Up Fast Services) मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवण्यात येईल. पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

  हार्बर लाइन

  कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन्स (सकाळी ११.१०ते दुपारी ०४.१०)

  सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.३४ ते दुपारी ०३.३९ या वेळेत वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर (Harbour) मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबईसाठी पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी १०.२१ ते दुपारी ०३.४१ या वेळेत अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान सीएसएमटी – कुर्ला आणि वाशी – पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम लाइन

  पश्चिम रेल्वेमार्गावर आज कोणताही जम्बोब्लॉक घेण्यात येणार नाही.