पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहून मगच प्रवासाचा आखा बेत

मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

  मुंबई : मध्य रेल्वेतर्फे(Central Railway), मुंबई विभागात (Mumbai Division) आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे.

  मध्य मेन मार्ग

  ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या लाईन सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० पर्यंत

  मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

  कल्याणहून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT, Mumbai) येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या / येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने आगमन होईल / सुटतील.

  हार्बर मार्ग

  पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (बेलापूर-खारकोपर बीएसयु लाइन वगळता)

  पनवेलहून (Panvel) सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत पनवेल/बेलापूर साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  पनवेलहून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणेहून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  नेरुळहून (Nerul) सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरसाठी सुटणाऱ्या डाऊन बीएसयु लाइन सेवा आणि खारकोपरहून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरुळसाठी सुटणाऱ्या अप बीएसयु लाइन सेवा रद्द राहतील.

  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन (Trans Harbour Line) सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर ते खारकोपर दरम्यान बीएसयु मार्गावरील लोकल ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील.

  पश्चिम मार्ग

  पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणत्याही प्रकारचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार नाही.