पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; घराबाहेर निघण्याआधी एकदा वेळापत्रक पाहून मगच निर्णय घ्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि भायखळा दरम्यान धीम्या व जलद मार्गावरील उपनगरी सेवा (लोकल ट्रेन) सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत रद्द राहतील. अप व डाऊन उपनगरी सेवा (लोकल ट्रेन) ब्लॉक कालावधीत भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट ओरिजनेट / शॉर्ट टर्मिनेट होतील.

  मुंबई : मध्य रेल्वेतर्फे आज देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  मेन मार्ग Main Line

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- भायखळा अप धीमी, डाऊन धीमी, अप जलद आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि भायखळा दरम्यान धीम्या व जलद मार्गावरील उपनगरी सेवा (लोकल ट्रेन) सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत रद्द राहतील.

  अप व डाऊन उपनगरी सेवा (लोकल ट्रेन) ब्लॉक कालावधीत भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट ओरिजनेट / शॉर्ट टर्मिनेट होतील.

  हार्बर मार्ग Harbour Line

  पनवेल – वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ वाजेपर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्गासह)

  डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर करिता सुटणारी व अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता सुटणाऱ्या उपनगरी सेवा (लोकल ट्रेन) रद्द राहतील.

  डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करिता सुटणाऱ्या आणि अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणेकरिता सुटणाऱ्या उपनगरी सेवा (लोकल ट्रेन) रद्द राहतील.

  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला विभागात विशेष गाड्या चालविल्या जातील.

  ब्लॉकच्या कालावधीत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

  पश्चिम मार्ग Western Line

  पश्चिम रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक, जम्बोब्लॉक घेण्यात येणार नाही.

  Relief to passengers on the Western Railway Megablocks today on both routes of the Central Railway Before you leave home look at the schedule and then make a decision