
नसे पदधिकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदधिकारी नजीम मुल्ला यांचे नाव आले आहे. याच पदाधिकाऱ्यांचे नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आले होते. या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी ठाकरेंनी केली. राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचे नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत या मुद्यांवर परखड मत व्यक्त केले. तसेच, माझ्यासाठी अनिल देशमुख हा मुद्दा महत्त्वाचा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
परमबीर सिंग यांना 100 कोटींच्या टार्गेटची आठवण पोलिस आयुक्त पदावरुन हटविले गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली?, असा सवालही राज यांनी उपस्थित केला तसेच, बार आणि रेस्टोरंटकडून 100 कोटींचे टार्गेट अनिल देशमुखांकडून दिले गेले हा आरोपच लांच्छनास्पद आहे, असेही ते म्हणाले.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पोलिसांनी स्फोटके ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मुळ मुद्दा भरकटू देऊ नका असे देखील राज ठाकरे म्हणाले.
राजरोसपणे खून पडणे योग्य नव्हे
दरम्यान, मनसे पदधिकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदधिकारी नजीम मुल्ला यांचे नाव आले आहे. याच पदाधिकाऱ्यांचे नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आले होते. या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी ठाकरेंनी केली. राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचे नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे ते म्हणाले.
उद्धवांना कोरपखळी
यावेळी उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आले की त्यांच्यावर राज्य आले, असा प्रश्न सध्या अनेकांना पडल्याची खोचक टीका ठाकरे यांनी केली. राज्य सरकारवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपासंदर्भात विचारणा करण्यात आली असता ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली. एका मित्राने मेसेज पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आले की, उद्धव ठाकरेंवर राज्य आले? असा मजकूर त्यामध्ये होता, असे राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
जानेवारीपासूनच सावध होणे गरजेचे होते
जानेवारी अखेरपासून लक्षण दिसायला लागली. तेव्हा पाऊल टाकणं आवश्यक होतं. खर्च झाला असता, तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले असते. कोणाला कंत्राट दिलं हे सुद्धा पाहिले नसते. आज हॉस्पिटल्स बेड देत नाहीत. बेडस असून देत नाहीत. बेडस असताना ते वापरले जात नसतील तर हॉस्पिटल करायची आहेत काय ? राज्यावर संकट येत असताना, हॉस्पिटल्सनी पुढे नको का यायला? असा सवालही त्यांनी केला.
तहान लागल्यावर विहीर खोदणे अयोग्य
तहान लागली की विहीर खोदणे हे बरोबर नाही. सराव करणाऱ्या खेळाडूंसाठीही काहीतरी सवलत सरकारने दिली पाहिजे. सरकारच्या तिजोरीची स्थिती आपण ऐकली आहे असेही ते म्हणाले.