ashok chavan

आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आरक्षण समितीवरून हटविण्यात यावे अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले.

आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांनी आंदोलनाचे हत्यार उपसून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुणे, नाशिक, रायगड आणि मराठवाड्यातून मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत.

आंदोलकांनी आज सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. मात्र, दुपारनंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. महिला आणि तरुणींचा सहभागही या आंदोलनात लक्षणीय होता.