Remove the cremation trap at Worli Cemetery; Dedication of naval work

माता रमाबाई आंबेडकर, वरळी स्मशानभूमी येथे पर्यावरण मंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पूर्ण करण्यात आलेल्या ५७ इंचाच्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज झाले. त्यामुळे अंत्यसंस्काराचा खोळंबा दूर होणार आहे.

    मुंबई : माता रमाबाई आंबेडकर, वरळी स्मशानभूमी येथे पर्यावरण मंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पूर्ण करण्यात आलेल्या ५७ इंचाच्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज झाले. त्यामुळे अंत्यसंस्काराचा खोळंबा दूर होणार आहे.

    यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, माजी आमदार सुनील शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, जल अभियंता अजय राठोर, सहाय्यक अभियंता जीवन पाटील, अभिजित पाटील, संकेत सावंत उपस्थितीत होते.

    वरळी स्मशानभूमी येथील विद्युत दाहिनी पाण्याच्या कमतरतेमुळे रात्री ८ वाजल्यानंतर बंद करावी लागत होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ५७ इंचाच्या मुख्य जलवाहिनीतून २४ तास सुरू असणारा पाणीपुरवठा वरळी स्मशानभूमीला देण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याअभावी अंत्यसंस्काराचा होणारा खोळंबा दूर होण्यास मदत होणार आहे.