रुबिका डिझाईन, गेम आणि ॲनिमेशन स्कूलच्या शास्त्रीय सल्लागार मंडळामध्ये प्रख्यात कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक गुलजार यांची निवड

सिनेमा क्षेत्रात ॲनिमेशन विषयाचे प्राबल्य वाढत असल्याचे मी दिग्दर्शक म्हणून अनुभवले आहे. त्यामुळे ॲनिमेशनचा वापर करून विविध विषयांवर भाष्य करायला आणि ते विषय प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी रुबिका संस्थेचे विद्यार्थी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.

    मुंबई : इंडस्ट्रीयल डिझाईन, गेम आणि ॲनिमेशन अशा विविध विषयांमध्ये कोर्सेस उपलब्ध करून देणाऱ्या रुबिका या अग्रेसर फ्रेंच क्रिएटिव्ह स्कूलच्या शास्त्रीय सल्लागार मंडळामध्ये प्रख्यात कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक गुलजार यांची निवड करण्यात आली आहे. रुबिका फ्रान्स या शैक्षणिक संस्थेच्या संपूर्णतः मालकीची असलेली रुबिका इंडिया आहे.

    व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधताना गुलजार म्हणाले, “गेमिंग आणि ॲनिमेशन या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि अध्यापनासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या रुबिका या प्रतिष्ठित संस्थेबरोबर जोडलो गेल्यामुळे मी खूप आनंदी आहे. ॲनिमेशन, नरेटिव्हस आणि स्टोरीटेलिंग विषयांमध्ये विद्यार्थ्यांना माझ्या अनुभवाचा फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. कविता आणि सिनेमा या क्षेत्रामध्ये अधिकाधिक योगदान देण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या कामामुळे शिक्षण क्षेत्रात भर पडणार आहे हे पाहून मला आनंद होत आहे.”

    अकादमी आणि ऑस्कर पुरस्कार विजेते असलेले गुलजार म्हणाले, “सिनेमा क्षेत्रात ॲनिमेशन विषयाचे प्राबल्य वाढत असल्याचे मी दिग्दर्शक म्हणून अनुभवले आहे. त्यामुळे ॲनिमेशनचा वापर करून विविध विषयांवर भाष्य करायला आणि ते विषय प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी रुबिका संस्थेचे विद्यार्थी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. भावना आणि सृजन कौशल्यांचा वापर करून संबंधित विषय ॲनिमॅटिक एक्सप्रेशनद्वारे मांडण्यासाठी माझ्या कार्यातून काही तरुण-तरुणींना प्रेरणा मिळेल याचा मला आनंद होत आहे.”

    जागतिक पातळीवर अग्रेसर असलेली संस्था आणि महान गीतकार यांच्यातील या महत्त्वपूर्ण सहयोगाची घोषणा करताना रुबिका इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मनोज सिंग म्हणाले, “गुलजार हे मंडळाचे सदस्य होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वैयक्तिक तसेच नातेसंबंध, सामाजिक विषय, मनुष्य-प्राणी यांच्यातील सहजीवन, पर्यावरण आणि विश्वातील विविध विषयांना गवसणी घालणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. कविता तसेच सिनेमा क्षेत्रातील त्यांचे सहा दशकांहून अधिक काळातील योगदान हे भरीव आहे आणि प्रेक्षकांबरोबर त्यांचे नाते तितकेच नैसर्गिकरित्या जोडलेले आहे. ‘जंगल जंगल बात चली है पता चला है…’ही प्रसिद्ध जिंगल किंवा स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील ‘जय हो’ हे ऑस्कर विजेते गाणे कोणीही विसरू शकत नाही.

    गुलजार यांच्याशी असलेल्या सहयोगामुळे ॲनिमेशन, दिग्दर्शन, सृजनशील लेखन, नरेटिव्ह आणि स्टोरीटेलिंग या क्षेत्राशी संबंधित शिक्षणाच्या असंख्य संधी आमच्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण होतील. या उपक्रमाचा भाग म्हणून आमच्या विद्यार्थ्यांकडून गुलजार यांच्या कवितांवर आधारित काही ॲनिमेशन लघुपट निश्चितच निर्माण होतील.

    गुलजार यांच्या प्रगल्भ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या लेखन कौशल्याने आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. ॲनिमेशन आणि गेम्स या माध्यमांच्या मदतीने त्यांचे हे कार्य आणखी पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुलजार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय संस्कृतीच्या पुरस्कार व प्रसारासाठी काही उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

    गुलजार यांचे स्वागत करताना, रुबिका फ्रान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन आंद्रे आपल्या व्हीडिओ संदेशाद्वारे म्हणाले,“गुलजार हे आमच्यासोबत आहेत हे आमचे भाग्य आहे. गुलजार यांच्याशी असलेल्या सहयोगामुळे रुबिका संस्थेमध्ये शिकविणारे तसेच शिकणाऱ्यांसाठी सर्वोत्तम ॲनिमॅटिक रिफ्लेक्शन तसेच सांस्कृतिक अनुभव मिळेल. मंडळामध्ये त्यांचे स्वागत आहे. आम्हाला त्यांच्याकडून वेळोवेळी क्रिएटीव्ह इन्पूट्स मिळतील याची आम्हाला खात्री आहे. रुबिकामध्ये मिळणाऱ्या शिक्षणामध्ये सांस्कृतिक वैविध्य असावे अशी आमची भावना आहे आणि गुलजार यांच्याशी असलेल्या सहयोगामुळे त्या दिशेने भरीव काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

    सुपीन्फोगेम (२००१), सुपीन्फोकॉम (१९८८) आणि दि हायर इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन – आयएसडी (१९८८) या तीन अग्रगण्य डिजिटल क्रिएशन स्कूलच्या समुहातून रुबिका या संस्थेचा उदय झाला आहे. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ग्रँड हेनॉटतर्फे १९८७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या रुबिका स्कूल्सने डिझाईन, व्हिडिओ गेम आणि ॲनिमेशन या क्षेत्रांमधील अनेक यशस्वी व्यक्तींची विद्यार्थी म्हणून जडण-घडण केली आहे.

    फ्रान्समधील सर्वोत्तम व्हीडिओ गेम स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच ॲनिमेशन करिअर रिव्ह्यूच्या बेस्ट इंटरनॅशनल ॲनिमेशन स्कूल इन दि वर्ल्ड २०१९ यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या रुबिका संस्थेचचे ५० हून अधिक देशांमध्ये ४५०० हून अधिक माजी विद्यार्थी आहे. रुकिज क्लासिफिकेशनच्या यादीमध्ये नुकतेच स्थान पटकाविणाऱ्या या संस्थेला टॉप रेटेड ग्लोबल स्कूल म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. रुबिका संस्थेचे चार कॅम्पस आहेत – व्हॅलेन्सिएन्स (फ्रान्स), मॉन्ट्रियल (कॅनडा), पुणे (भारत) आणि नैरोबी (केन्या).

    विविध सर्वेक्षण आणि अभ्यासानुसार, भारतीय ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि पोस्ट प्रोडक्शन क्षेत्राची पुढील पाच वर्षात दुपटीने वाढ होईल व या वाढीचा संचयित दर हा २०१९ ते २०२४ या कालावधीत १६ टक्के असेल. मात्र, कुशल मनुष्यबळाची कमतरता हे या क्षेत्रातील मोठे आव्हान असणार आहे. या क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या संस्थांमध्ये रुबिकाचा समावेश आहे. त्याचा फायदा जगभरातील व्यवसाय क्षेत्राला होईल.

    Renowned poet lyricist writer director Gulzar selected in Rubika Design Games and Animation Schools Scientific Advisory Board