renu sharma

धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्यावर बलात्काराचे(rape) आरोप करणाऱ्या रेणू शर्मा(renu sharma) या महिलेने ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्यालाही फोनवरून त्रास दिल्याबाबत माजी आमदार भाजपचे मुंबईतील नेते कृष्णा हेगडे यांनी मुंबईतील अंबोली पोलीस टाण्यात तक्रार दाखल केली आहे. जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनीदेखील पैश्याच्या मागणीसाठी रेणू शर्मा या महिलेने छळल्याबाबत तक्रार केली आहे. 

मुंबई :  धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्यावर बलात्काराचे(rape) आरोप करणाऱ्या रेणू शर्मा(renu sharma) या महिलेने ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्यालाही फोनवरून त्रास दिल्याबाबत माजी आमदार भाजपचे मुंबईतील नेते कृष्णा हेगडे यांनी मुंबईतील अंबोली पोलीस टाण्यात तक्रार दाखल केली आहे. जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनीदेखील पैश्याच्या मागणीसाठी रेणू शर्मा या महिलेने छळल्याबाबत तक्रार केली आहे.

मे २०१८ पासून रेणू शर्मा ही महिला एकाचवेळी  इतक्या मोठ्या लोकांच्या संपर्कात कशी होती अशी वेगळीच चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे. रेणू शर्मा यांनी मनसेचे नेते मनिष धुरी यांना देखील अशा प्रकारे ब्लॅकमेल केल्याचा फोन केला होता,अशी माहिती भाजपो नेते कृष्णा हेगडे यांनी माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना हेगडे यांनी सांगितले की, हे हनी ट्रॅपचे जाळे आहे कोणत्याही महिलेच्या विरोधात असे आरोप मी उगाच का करू धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आल्याने मी माझ्या बाबतही हे झाल्याबाबत तक्रार केली आहे तर मला मनिष धुरी यांनी देखील त्यांनाही असाच अनुभव आल्याचे कळविल्याचे ते म्हणाले. भाजप उपाध्यक्ष व माझी आमदार कृष्णा हेगडे ब्लॅकमेलिंग प्रकरणानंतर आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जेट एअरवेजचे अधिकारी असलेले रिझवान कुरेशी यांना देखील या रेणु शर्माने असेच छळले होते. प्राप्त कागदपत्रांवरून असे दिसून येत आहे की ही रेणु शर्मा या रिझवान कुरेशींसोबत मे २०१८ पासुन ते जुलै २०१९ पर्यंत संबंधात होती. त्याच्यासोबत फिरायला गेली, हॉटेलात गेली, रेस्टॉरंट्स मध्ये गेली, घरी गेली वगैरे. तथापि जेव्हा त्याने पैसे देणे बंद केले तेव्हा त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. रेणू शर्मा यांचा वकील रमेश त्रिपाठी यांच्यावर देखील एका महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे