रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करायची, भाजप नेते कृष्णा हेगडे यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात लवकरच पोलिसांकडून चौकशी करण्यात येईल. दरम्यान रेणू शर्मा या महिलेविरोधात आता भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

“रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करायची तिने मला शेवटचा मेसेज ०६ जानेवारी २०२१ला केला होता. मात्र मी मेसेजला उत्तर दिलं नाही.. फ्रेंडशीप किंवा संबंधात राहू यासाठी ती महिला (रेणू शर्मा) प्रयत्नशील होती, पण मी तिला रिस्पॉन्स दिला नाही. ४ ते ५ वर्ष तिचे कॉल आणि मेसेज आले परंतु मी तिला एंटरटेन केलं नाही मी तिला दूर ठेवलं .. ६ जानेवारी आणि ७ जानेवारीला तिने मला मेसेज केला…. आप मुझे भूल गये क्या” असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले. तसेच रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तेव्हा, मी माझ्या काही परिचयाच्या माणसांकडून तिची माहिती काढली. तेव्हा, रेणू शर्मा फसवणूक करते, हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवत असल्याची मला माहिती मिळाली” असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.

“काही दिवसातच धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी त्यांना ती महिला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. रेणू शर्मा सारखे जे लोक ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड झाला पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे म्हणून मी आज तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलो” असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.