ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा : व्टिट करत छत्रपती संभाजी राजेंचे खासदार राणेंना प्रत्यूत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात भाजपच्या दोन राज्यसभा खासदारांमध्ये सवाल-जबाब सुरू आहेत. 'संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, रयत त्यांच्या बाजूने आहे का? अशी टिका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली. या टीकेनंतर संभाजीराजेंनी राणे यांचे नाव न घेताच व्टिट करत त्यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.  

    मुंबई : ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही, त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,’ असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे, असे व्टिट करत खा. संभाजीराजे यांनी खा नारायण राणे यांचा उल्लेख टाळून जबाब दिला आहे.

    रयत त्यांच्या बाजूने आहे का?

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात भाजपच्या दोन राज्यसभा खासदारांमध्ये सवाल-जबाब सुरू आहेत. ‘संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, रयत त्यांच्या बाजूने आहे का? अशी टिका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली. या टीकेनंतर संभाजीराजेंनी राणे यांचे नाव न घेताच व्टिट करत त्यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

    ताकद योग्य वेळी दाखवू

    या व्टिट मध्ये खा. संभाजीराजे यानी म्हटले आहे की, ‘छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही, त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,’ असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.