पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष १० जागांवर लढणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी लागले असून रिपब्लिकन पक्ष ही १० जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.पश्चिम बंगाल रिपाइंचा मेळावा कोलकाता येथे घेण्यात आला. त्या ना. रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइंचे पश्चिम बंगालचे प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक उपस्थित होते. यावेळी मिस इंडिया मॉडेल असलेल्या यांनी पक्षात प्रवेश केला.

पश्चिम बंगाल च्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्या तृणमूल काँग्रेसचे पानिपत होणार असून एनडीएचा प्रचंड मोठा विजय होईल. पश्चिम बंगाल मध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडी ला आरपीआयचे समार्थन राहील.भाजप सोबत आरपीआय ची युती राहणार असून पश्चिम बंगाल मध्ये भाजप आरपीआय एनडीएचा मोठा विजय होईल तर तृणमूल काँग्रेस चा दारुण पराभव होईल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. भाजप एनडीएला पश्चिम बंगाल मध्ये जन समर्थन वाढत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पश्चिम बंगाल मध्ये सत्ता परिवर्तन होणार असल्याचा दृढ विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. लवकरच पश्चिम बंगालचे भाजपच्या प्रदेश अध्यक्षांशी आरपीआय भाजप निवडणूक युती आणि जागावाटपबाबत चर्चा होणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले कोलकाताच्या दौऱ्यावर आले असता कोलकाता विमानतळावर एस सी एस टी कर्मचारी युनियन च्या कार्यालयाचे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कोलकाता प्रेस क्लब येथे प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.