कोरोनावर मात देण्यासाठी संशोधन; BMC घेणार आयआयटी मेडिकल विद्यार्थ्यांची मदत

मुंबईत कोविडची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर आता पालिकेने तिसऱ्या लाटेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच ती कशी थोपवता येईल, याबाबत विचार सुरू आहे. पालिकेने आता कोरोनावर मात देण्यासह त्यावर संशोधन करण्यावरही जोर दिला आहे. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे डॉक्टर्स आणि आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने पालिकेने संशोधनाची तयारी सुरू केली आहे.

  मुंबई : मुंबईत कोविडची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर आता पालिकेने तिसऱ्या लाटेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच ती कशी थोपवता येईल, याबाबत विचार सुरू आहे. पालिकेने आता कोरोनावर मात देण्यासह त्यावर संशोधन करण्यावरही जोर दिला आहे. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे डॉक्टर्स आणि आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने पालिकेने संशोधनाची तयारी सुरू केली आहे.

  काेरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान पालिकेने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मिशन सेव्ह लाईव्स’ आण्िा ‘ब्रेक दी चैन’सारख्या योजनांवर काम केले. पालिकेला चांगले परिणाम देखील मिळाले. परंतु, कोणती योजना सर्वाधिक उपयोगी आणि लाभदायक आहे, हे देखील पालिकेला पहावयाचे आहे.

  अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही योजनांवर काम करत आहोत. पंरतु, कोणती योजना सर्वाधिक उपयोगी ठरेल, हा संशोधनाचा विषय आहे. एकदा का आम्हाला हे स्पष्ट झाले तर कोरोनावर रणनीती तयार करण्यास मदत मिळेल. यासाठी आम्ही मुंबईतील काही नामांकित संस्थांची मदत घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

  काही प्रभागांमध्ये रुग्णसंख्या कमी

  मुंबईतील ४ प्रभागांमध्ये २ जूनपर्यंत ‘बी’ वॉर्डमध्ये २,३०८ रुग्ण, ‘सी’ वॉर्डमध्ये ६६२९ रुग्ण, ‘ए’ वॉर्डमध्ये १५,५१४ रुग्झा आणि ‘एफ. एस.’ वॉर्डमध्ये १९,६०७ सर्वाधिक कमी रुग्ण आढळून आले आहेत. तर पश्चिमममध्ये ५१ हजार ६७५ आणि सेंट्रलमध्ये ४८ हजार ५१७, के. ई. मध्ये ४४,०१० आणि आर. एस. मध्ये ४३,२६३ सर्वाधिक जास्त रुग्ण आढळले. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या कमी तर दुसरीकडे जास्त, असे का? यावर शोध घेतला जाणार आहे. यासाठी पालिकेने चार ते पाच प्रभागांचा शोध घेऊन पालिकेच्या योजनांमुळे रुग्णसंख्या कमी आली की येथील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे, यावर संशोधन करण्यात येणार आहे.

  आयआयटी, मेडिकल विद्यार्थ्यांची मदत

  पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या संशोधनासाठी आयआयटी बॉम्बे, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. तसे विद्यार्थ्यांना निर्देशही देण्यात आले आहेत. जितके होईल, तितक्या प्रमाणात संशोधन करून त्यांचे निष्कर्ष जर्नल प्रकाशित करण्याचे निर्देश विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत.