महाविकास आघाडी सरकारमध्ये फेरबदल, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्यांना मिळणार डच्चू?

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह तिनही पक्ष विस्तार आणि फेरबदलास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची रिक्त असलेली दोन्ही मंत्रिपदं भरण्याबाबत दोन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह तिनही पक्ष विस्तार आणि फेरबदलास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची रिक्त असलेली दोन्ही मंत्रिपदं भरण्याबाबत दोन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचं एक मंत्रीपद रिक्त आहे. तर संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचंही एक मंत्रिपद रिस्त आहे. काँग्रेसही आपल्या मंत्र्यांमध्ये फेरबदलाच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल महाविकास आघाडीत नाराजीचा सूर आहे.

    दरम्यान यात आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.त्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पाडवी यांच्या जागी आदिवासी चेहरा तर अस्लम शेख यांच्या जागी मुस्लिम चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

    काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल नाराजी

    तसेचं काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल पक्षामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे.  त्यांच्या जागी दोन नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाडवी यांच्या जागी आदिवासी चेहरा, तर अस्लम शेख यांच्या जागी मुस्लिम चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.