बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत रहिवाश्यांची मागणी पूर्ण होणार

वरळी (Worli) , एन एम जोशी मार्ग (N.M. Joshi Marg) आणि नायगाव (Naigaon ) येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास (Redevelopment of BDD plots) वेगावे व्हावा, यासाठी राज्य सरकारने (State  Government) यामध्ये लक्ष घातले आहे. ट्रांजिट करारासोबतच (Transit Agreement)  पुनर्वसन इमारतींशी करार (Agreement) करण्यास आणि बीडीडी रहिवाशांची मागणी मान्य केली असून राज्य सरकारने ट्रांजिट कँपमध्ये (Camp) स्थलांतर होणाऱ्या रहिवाश्यांना म्हाडाकडून नियम देण्यात आले आहेत.

मुंबई : वरळी (Worli) , एन एम जोशी मार्ग (N.M. Joshi Marg) आणि नायगाव (Naigaon ) येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास (Redevelopment of BDD Chawl) वेगावे व्हावा, यासाठी राज्य सरकारने (State  Government) यामध्ये लक्ष घातले आहे. ट्रांजिट करारासोबतच (Transit Agreement)  पुनर्वसन इमारतींशी करार (Agreement) करण्यास आणि बीडीडी रहिवाशांची मागणी मान्य केली असून राज्य सरकारने ट्रांजिट कँपमध्ये (Camp) स्थलांतर होणाऱ्या रहिवाश्यांना म्हाडाकडून नियम देण्यात आले आहेत. कारण ट्रांजिट कँपमध्ये स्थलांतर झाल्यानंतर लवकर घरे बांधून मिळण्याची लोकांना आशा असते. त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीमध्ये स्वत: लक्ष घालून कोणत्याही नियमांची पर्वा न करता, एन एम जोशी मार्गातील २६९ रहिवाश्यांसाठी घरांची लॉटरी काढ्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील म्हाडा मंडळाचे मुख्य अधिकारी योगेस म्हसे यांनी सांगितलं की, एन एम जोशी मार्गावरील चाळीतील निवासांची योग्य निश्चित करून त्यांना स्थलांतरित करण्याचे काम वेगाने चालत आहे. तसेच ट्रांजिट कँपमध्ये स्थलांतरित झालेल्या रहिवाश्यांसाठी एक भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य म्हणजे सर्वात पहिले २६९ घरांची ऑनलाईन लॉटरी लवकरात लवकर काढली जाईल. तसेच ही लॉटरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आगामी महिन्यातील ऑक्टोंबरमध्ये ऑनलाईन लॉटरी काढण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे म्हाडाने सुद्धा आपल्या कामाला सुरूवात केली आहे.

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन एम जोसी मार्गावर एकूण २५६० भाडेकरू आहेत. येथील पुनर्विकास ३ टप्प्यांत पुढील ७ वर्षांसाठी असणार आहे. तर पहिल्ला टप्प्यात १० चाळींसाठी ८०० घरांच्या कामाला सुरूवात केली आहे. यामध्ये ६१७ लोक योग्य आहेत आणि २६९ लोक ट्रांडिट कँपमध्ये स्थलांतर झाले आहेत. त्यांच्यासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्याचप्रकारे अन्य लोकांना सुद्धा ट्रांसिट कँपमध्ये स्थलांतरित केलं जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून त्याबाबतही येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह त्यांनी केला. सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी या सर्व अडचणी दूर करून कालबद्ध रीतीने पुनर्विकास मार्गी लावावा व याबाबत दर काही दिवसांनी आढावा घेत राहावा, अशीही मुख्यमंत्र्यांनी सूचना केली.