मुंडे समर्थकांचे राजीनामासत्र; मुंबईत उद्या बैठक, भाजपने पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना जाणीवपूर्वक डावलले; समर्थकांचा आरोप

केंद्राच्या मंत्रिमंडळ (the Union Cabinet) विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यानी आपण नाराज नसल्याचे सांगितले मात्र तरीदेखील त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र (the resignation session of supporters) काही थांबताना दिसत नाही. सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील (Beed district) मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले.

  मुंबई (Mumbai).  केंद्राच्या मंत्रिमंडळ (the Union Cabinet) विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यानी आपण नाराज नसल्याचे सांगितले मात्र तरीदेखील त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र (the resignation session of supporters) काही थांबताना दिसत नाही. सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील (Beed district) मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. त्यानंतर हे राजीनाम्याचे लोण अहमदनगरमध्येही पोहोचले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि आता तर मुंबईतून भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे (Adinath Damale) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  माध्यमांशी बोलणार नाहीत
  त्यामुळे पंकजा मुंडे उद्या मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्या माध्यमांशी बोलणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यावरून तर्क लावण्यात येत आहेत की भाजप वरिष्ठ नेत्यांनी त्याची कान उघाडणी करत कार्यकर्त्यांना आवरण्यास सांगितले असावे. आदिनाथ डमाळे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात डावलण्यात आल्यानेच आपण राजीनामा देत असल्याचे डमाळे यांनी पत्रात म्हटले आहे.

  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे
  ‘प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे दिसत आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या विस्तारासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्याच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या आणि पक्षविस्तारासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

  हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहन होणारे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत मी माझ्या चिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. तरी आपण त्याचा स्वीकार करावा,’ असे आदिनाथ डमाळे यांनी चंद्रकांत पाटलांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मंगळवारी त्यांची भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.

   दोन वर्षापासून खदखद
  पंकजा मुंडे २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाराज होत्या; कारण त्याना डावलण्यात आल्याची भावना होती. तेंव्हा पासून मुंडे समर्थकांच्या मनात खदखद आहे. त्यानंतर पंकजा यांना राष्ट्रीय सचीव करण्यात आले आणि काही प्रमाणात त्यांच्या नाराजीला शांत करण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रीतम मुंडे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्याने याच नाराजीचा पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाकडून या नाराज समर्थकांची समजूत घाला असे आदेश पंकजा याना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर माध्यमांसमोर त्या येणार नसल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना टिम देवेंद्र इत्यादी वक्तव्यांवरून समज देण्यात आल्याचे मानले जात आहे.