कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी विधिमंडळाच्या शिफारशीचा ठराव मंजूर…

राज्याच्या विकासात सर्व समाज घटकाचे योगदान असून राज्य घटनेला अभिप्रेत समान संधी देण्याचे धोरण लक्षात घेता कैकाडी समाजाला देखील विदर्भात ज्या पध्दतीने अनु. जाती मध्ये समाविष्ट केले जाते त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागातही त्यांचा समावेश करावा या करीता केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे यानी विधानसभेत मांडला त्यानंतर तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

    मुंबई : राज्याच्या विकासात सर्व समाज घटकाचे योगदान असून राज्य घटनेला अभिप्रेत समान संधी देण्याचे धोरण लक्षात घेता कैकाडी समाजाला देखील विदर्भात ज्या पध्दतीने अनु. जाती मध्ये समाविष्ट केले जाते त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागातही त्यांचा समावेश करावा या करीता केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे यानी विधानसभेत मांडला त्यानंतर तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

    दरम्यान यावेळी सदस्यांना माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी मराठवाड्याचा काही भाग निजामाच्या ताब्यात राहिला होता. या भागातील मागासवर्गीय कैकाडी समाजालाअनु जातीच्या सवलतींचा लाभ त्यामुळे लागू होवू शकला नाही. त्यानंतर विदर्भातील उर्वरित राज्यातील आणि मराठवाड्यातील कैकाडी समाजाचे वर्गीकरण भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या संवर्गात होत राहिले आहे, ते एकत्रित करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्या करीता केद्राला शिफारस या ठरावून केली जात आहे.