Restaurant owners demand to keep the restaurant open till 1.30 am Emphasis on making up for losses incurred during the Coronavirus period nrvb
रेस्टॉरंट रात्री १.३० पर्यंत खुली ठेवण्याची व्यावसायिकांची मागणी ; कोरोना काळात झालेला तोटा भरून काढण्यावर भर

सध्याची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने काही गोष्टी शिथिल केल्या असल्या तरी पुरेशा प्रमाणात ग्राहक येत नसल्याने सर्व गोष्टींवर होणारा सोजचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न या रेस्टॉरंट मालकांपुढे आ वासून उभा आहे. त्यातच कामगारही पुरेशा प्रमाणात उपलब्ध हेत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे.

मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या. रेस्टॉरंट क्षेत्रालाही याची मोठ्या प्रमाणात छळ बसली आहे. हळूहळू सर्व गोष्टी अनलॉक होत आहेत. पण काही व्यवसायांना वेळ ठरवून दिल्याने याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. या काळातील तोटा भरून काढण्यासाठी रेस्टॉरंट रात्री १.३० पर्यंत खुली ठेवण्याची मागणी रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

सध्याची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने काही गोष्टी शिथिल केल्या असल्या तरी पुरेशा प्रमाणात ग्राहक येत नसल्याने सर्व गोष्टींवर होणारा सोजचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न या रेस्टॉरंट मालकांपुढे आ वासून उभा आहे. त्यातच कामगारही पुरेशा प्रमाणात उपलब्ध हेत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे. त्यामुळे हे व्यावसायिक इकडे आड आणि तिकडे विहीर अशा कात्रीत सापडले आहेत. याबाबत आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्व रेस्टॉरंट व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत तुमचं अमूल्य मत नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा.