रेस्टॉरंट, बारवाले, भेटले आणि… निर्बंधांवरून ‘वाटाघाटीचा’ सरकारचा नवा धंदा; आशिष शेलार यांचा घणाघाती आरोप

ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे. वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात. म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले आणि ‘वाटघाटी’ झाल्या. वाटा मिळाला की निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे, मराठी कलावंत, नाट्य कलावंत, मराठी लोककलावंत, धुप-कापूर विकणारे घाट्यात आहेत. ते वाटाघाटी करू शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा. आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल करीत भाजपा आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली.

  मुंबई : ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे. वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात. म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले आणि ‘वाटघाटी’ झाल्या. वाटा मिळाला की निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे, मराठी कलावंत, नाट्य कलावंत, मराठी लोककलावंत, धुप-कापूर विकणारे घाट्यात आहेत. ते वाटाघाटी करू शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा. आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल करीत भाजपा आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली.

  गोविंदा काय लादेन आहेत काय?

  मंगळवारी दिवसभर गोविंदाला नोटीस, धरपकड, बळाचा वापर, अटक, या सर्व गोष्टी महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या. जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरू होता. ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, कोट्यवधीची वसुली केल्याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय? बळाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, खटले दाखल केले जात आहे, म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतो आहे, असे शेलार म्हणाले.

  गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्डब्रेक केले आहेत, पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे. मुख्यमंत्री म्हणतात, आमचा सणांना विरोध नाही, आमचा कोरोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते. मग मुंबईतील, राज्यातील रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का?, असा सवालही शेलार यांनी सरकारला विचारला.

  मंदिरे उघडू नका असे केंद्राने कधी सांगितले?

  मंदिरं उघडण्याच्या भाजपाच्या मागणीला उत्तर म्हणून केंद्र सरकारकडे बोट दाखवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील निशाणा साधला. मंदिर उघडू नका असे केंद्र सरकारने अजिबात सांगितलेले नाही. देशातील सगळ्या राज्यांनी मंदिरे उघडली आहेत. त्यामुळे आपल्या मनासारखे करून केंद्रावर ढकलणे बंद करा, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सगळ्या राज्यांत मंदिरे खुली आहेत. दारूची दुकाने उघडण्यास सरकार परवानगी देते, मॉल उघडले जातात, हॉटेल्स उघडली जातात. हे सगळे उघडणे आवश्यक आहे. त्यांना आमचा विरोध नाही. पण तिथे गर्दी होत नाही का? फक्त मंदिरातच गर्दी होते का? राज्य सरकारचा हा तर्क पूर्णपणे चुकीचा आहे. या संदर्भात वस्तुनिष्ठ विचार केला गेला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

  राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतील एका घटक पक्षाच्या राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्या वतीने वाटाघाटीसाठी मध्यस्थी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करू, असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करावे, अन्यथा आम्ही नाव जाहीर करू.

  - आशिष शेलार, आमदार, भाजपा