रिझर्व्ह बँकेने उठवले निर्बंध ; युथ डेव्हलपमेंट को – ऑप. बँक पुन्हा सुरू

बँकेचे नेतृत्व सध्या, चेतन नरके करत आहेत. चेतन नरके हे देशविदेशातील विविध संस्थांवर काम करत आहेत. राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा त्यांना गाढा अभ्यास आहे. त्यामुळे बँकेची गाडी रुळावर आणण्यासाठी त्यांच्या या अनुभवाचा आणि प्रयत्नांचा दांडगा फायदा झाला आहे. बँकेची सध्याची सांपत्तिक स्थिती भक्कम आहे. बँकेकडील निधी, गुंतवणूक, रेखता पाहूनच रिझर्व बँकेने ही परवानगी दिली आहे

    मुंबई : संपूर्ण राज्यातील सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेली कोल्हापूर जिल्ह्यातील ‘युथ डेव्हलपमेंट को – ऑप. बँक आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने निर्बंध उठवताच अल्पाधवीत सुरु होणारी महाराष्ट्रातील ही पहिली सक्षम बँक ठरली आहे. बँकेने लादलेल्या निर्बंधाची मुदत, ५ एप्रिल २०२१ रोजी संपल्याने, ही बँक सुरू झाली आहे. योग्य व्यवस्थापण आणि आर्थिक नियोजन केल्यामुळे २ वर्षातच बँकेची आर्थिक गाडी रुळावर आली आहे. त्यामुळे सभासद आणि ग्राहकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

    या बँकेचे नेतृत्व सध्या, चेतन नरके करत आहेत. चेतन नरके हे देशविदेशातील विविध संस्थांवर काम करत आहेत. राष्ट्रीय – आंतराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा त्यांना गाढा अभ्यास आहे. त्यामुळे बँकेची गाडी रुळावर आणण्यासाठी त्यांच्या या अनुभवाचा आणि प्रयत्नांचा दांडगा फायदा झाला आहे. बँकेची सध्याची सांपत्तिक स्थिती भक्कम आहे. बँकेकडील निधी, गुंतवणूक, रेखता पाहूनच रिझर्व बँकेने ही परवानगी दिली आहे.तर बँक प्रशासनाकडून, यापुढील काळात एच.डी.एफ.सी / आय.सी.आय.सी.आय या खासगी क्षेत्रातील प्रगतशील बँकांच्या धर्तीवर कामकाज करुन, बँकेला भरारी देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

    – बँकेची सांपत्तिक स्थिती आता सक्षम आहे बँकेकडे भागभांडवल – ६.५२ कोटी रूपये असून १७. ९२ कोटी रूपयांचा निधी, आणि ७४.२१ कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. तर कर्जे १३.०४ कोटी रूपयांची आहेत. गुंतवणूक – ६९.०० कोटी रूपयांची असून बॅकेला ७.०० कोटी रूपये नफा झाला आहे. सीआरएआरचे प्रमाण सध्या ( आवश्यक प्रमाण किमान ९ टक्के ) १५ टक्केच्या वर आहे. तर नेटवर्थ ( उणे नसावे ) ३ कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.